अलाईव्हच्या श्री. उमेश वाघेला यांना श्री मोरया गोसावी पुरस्कार!

अलाईव्हच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा!

चिंचवड देवस्थान ट्रस्ट द्वारा आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळा, वर्ष 464, (सन 2025) निमित्त दि.9 डिसेंबर 2025 रोजी संजीवन समाधीच्या पूर्वसंध्येला चिंचवड, पुणे येथे पक्षी व वन्यजीव अभ्यासक आणि अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक उमेश भगवानजी वाघेला यांना फोर्स मोटर्स(बजाज टेंपो)चे ज्येष्ठ उद्योजक व अध्यक्ष श्री. अभय फिरोदिया यांच्या हस्ते  ‘श्री मोरया गोसावी पुरस्कार’ प्रदान करुन गौरविण्यात आले. पुरस्कार सन्मानचिन्ह, शाल, गुलाबपुष्प, श्रीफळ, मोरया दिनदर्शिका आणि रु.5000/- असे पुरस्काराचे स्वरुप आहे.  हा पुरस्कार उमेश वाघेला यांना वन्यजीव आणि निसर्ग संवर्धन क्षेत्रात गेले 17 वर्षे उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल देण्यात आला आहे. 

अलाईव्हच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा!

श्री. वाघेला ह्यांचा सन्मान करताना

0 प्रतिसाद ते “अलाईव्हच्या श्री. उमेश वाघेला यांना श्री मोरया गोसावी पुरस्कार!”