एकेकाळी आपल्या अंगणात बागडणाऱ्या चिमण्या आता दुर्मिळ झाल्या आहेत, ही गोष्ट आपल्या पर्यावरणात होणाऱ्या बदलांची जाणीव करून देते. म्हणूनच, निसर्ग आणि जैवविविधतेचा हा अनोखा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत. जागतिक चिमणी दिना निमित्ताने पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या सहकार्याने आणि पक्षी आणि निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित ‘चला चिऊ वाचवू अभियान 2026’ अंतर्गत विविध चिमणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाचे हे अकरावे वर्ष आहे. चित्रकला, कथा, कवितांच्या माध्यमातून चिमण्या, इतर पक्षी आणि आपल्या आसपासच्या निसर्गाबद्दलचे तुमचे विचार, भावना आणि निरीक्षणे आमच्यासोबत शेअर करा. तुमच्या सर्जनशीलतेतून चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती व्हावी आणि आपण सर्वांनी मिळून या छोट्या जीवांसाठी काहीतरी ठोस कृती करावी, हाच यामागचा उद्देश आहे.
चिमणी चित्रकला स्पर्धा स्पर्धकांनी ए3 आकारातील कागदावर पेन्सिल किंवा कोणत्याही प्रकारच्या रंग माध्यमात काढलेले चित्र पाठवावे. कृपया स्पर्धकांनी एकच चित्र पाठवावे. सर्व वयोगटासाठी खुली आहे.
चिमणी कथा स्पर्धा – चिऊताईबद्दल काल्पनिक किंवा स्वानुभवावर आधारित स्वरचित एक कथा, ज्याची शब्दमर्यादा ५०० ते १००० आहे. मराठी, हिंदी, गुजराती किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत आपली रचना पाठवू शकता. वयोगट: 18 वर्षे पासून पुढे सर्वांसाठी.
चिमणी कविता स्पर्धा – चिऊताईवर मराठी, हिंदी, गुजराती किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत एक स्वरचित कविता पाठवू शकता. कवितेला शब्दमर्यादा नाही. वयोगट: 18 वर्षे पासून पुढील सर्वांसाठी.
चिमणी रांगोळी स्पर्धा: तुमच्या दारात, व्हरांड्यात किंवा अंगणात पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून चिमणीच्या संकल्पनेवर आधारित रांगोळी काढा. यासाठी पारंपारिक रांगोळी, नैसर्गिक रंग, फुले, पाने, धान्य व इतर नैसर्गिक साहित्य वापरु शकता. डिझाइनच्या गरजा: रांगोळीमध्ये ‘चिमणी’ हा मुख्य घटक असला पाहिजे. रांगोळीच्या खाली “अलाईव्ह – चला चिऊ वाचवू अभियान” हा संदेश लिहा. शेजाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही रांगोळी जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवा. वयोगट: वय वर्षे 12 पासून पुढील सर्वांसाठी.
कथा आणि कविता मराठी, गुजराती, हिंदी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत गुगल किंवा युनिकोड फॉंटमधे टाईप केलेली वर्ड फाईल असावी. सर्व रचना पूर्णपणे स्वरचित असावी. तसेच ती कोठेही कोणत्याही स्वरूपात प्रकाशित झालेली नसावी. कोठूनही नक्कल केलेली, चोरलेली अथवा एआय द्वारे तयार केलेली आढळल्यास स्पर्धेत ग्राह्य धरली जाणार नाही. आपली रचना या लिंक https://alivetrust.in/sparrow वर अपलोड करावी. स्पर्धा कालावधी दि. 6 ते 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे.
कोणत्याही स्पर्धेत प्रवेश फी नाही. वयोगटानुसार सर्व स्पर्धेत भाग घेऊ शकता. सर्वाधिक सहभाग नोंदवणार्या शाळांना विशेष पारितोषिक देण्यात येईल. पारितोषिक वितरण सोहळा रविवार दि. 15 मार्च 2026 रोजी होईल. स्पर्धा निकाल अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्टच्या वेबसाईटवर तसेच व्हॉट्सप चॅनल वर घोषित करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क: भ्रमणध्वनी क्र. 9922507330 किंवा 9881101541.



3 प्रतिसाद ते “चला चिऊ वाचवू अभियान 2026”
चिमणी
कुठे हरवीली ती चिमुकली चिमणी
अंगणात गाणारी चिऊ चिऊ गाणी
इवल्याश्या चोचीने वेचणारी दाणी
थवा करून राहणारी चिमुकली चिमणी
एकजुटीचा संदेश देणारी वाणी
आम्ही म्हणत होतो तिला चिऊताई
तिच्या आवाजाने सुरु होई आमुची घाई
न चुकता टाकी दाणापाणी आई
फस्त करी थव्याने लगेच आमुची चिऊताई
चोचीने आणि काडी कचरा वेचूनि चिमणा चिमणी
सुंदर असे घरटे बांधी घरात आणि
इवलेशे पक्षी ठेवी घरट्यात चिमणा चिमणी
भरवी त्यांना चोचीने दाणापाणी
पंख फुटल्यावर पक्षी घेई भरारी
पारखे झाले हे सारे आमुच्या दारी
गवसेल का परत आम्हा चिऊताई न्यारी?
तिला शोधतो आम्ही दारोदारी
…©️स्वाती वक्ते ,पुणे
मी स्वाती वक्ते. मी माझी स्वालिखित कविता चिमणी स्पर्धेसाठी पाठवत आहे.
धन्यवाद
धन्यवाद,
पण स्पर्धेत गृहीत धरण्यासाठी कृपया फॉर्म मार्फत सबमिट करावी, अन्यथा माग ठेवणे अशक्य होईल.