

Select your language
जागतिक चिमणी दिनानिमित्त, पुण्याच्या ‘अलाईव्ह चॅरिटेबल ट्रस्ट’ तर्फे आयोजित ‘चला चिऊ वाचवू अभियान’ (Let’s Save Sparrow Mission) आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत!
एकेकाळी आपल्या अंगणात बागडणाऱ्या चिमण्या आता दुर्मिळ झाल्या आहेत, ही गोष्ट आपल्या पर्यावरणात होणाऱ्या बदलांची जाणीव करून देते. म्हणूनच, निसर्ग आणि जैवविविधतेचा हा अनोखा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत. चित्रकला, लेख किंवा कवितांच्या माध्यमातून चिमण्या, इतर पक्षी आणि आपल्या आसपासच्या निसर्गाबद्दलचे तुमचे विचार, भावना आणि निरीक्षणे आमच्यासोबत शेअर करा. तुमच्या सर्जनशीलतेतून चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती व्हावी आणि आपण सर्वांनी मिळून या छोट्या जीवांसाठी काहीतरी ठोस कृती करावी, हाच यामागचा उद्देश आहे.
महत्त्वाच्या सूचना:
- स्पर्धेतून अपात्र ठरू नये म्हणून आपली कलाकृती योग्य विभागात (Category) सादर करा.
- कलाकृती पूर्णपणे मूळ (Original) असावी. ती चोरलेली (Plagiarised) किंवा AI द्वारे तयार केलेली नसावी.
- स्पर्धेचा निकाल मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल (आमच्या वेबसाइटवर किंवा व्हॉट्सॲप चॅनेलवर).
- स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख: १५ फेब्रुवारी २०२६.
- स्पर्धेत सहभागी होऊन तुम्ही आमच्या सर्व नियम आणि अटी मान्य करत आहात.




Last Date of Submission : 15 20 Feb 2026
By submitting your entry in any of the competitions you agree with our terms and conditions.





